क्रांतीसूर्य महात्मा फुले हे कोण आहेत हे एकदा भिडेला समजावून सांगतो . - व्याख्याता अमर हजारे

क्रांतीसूर्य महात्मा फुले हे कोण आहेत हे एकदा भिडेला समजावून सांगतो .

(जे युवक त्याला डोक्यावर घेऊन नाचतात त्या युवकांनी इतकेच सांगावे की त्याने असे समाजोपयोगी काय काम केली)

१) क्रांतीबा जे आईचे छत्र हरवले आणि पुढे दुःख पचवून आईविना मोठे झाले

२) स्वतःचे शिक्षण पूर्ण केले आणि पत्नीला शिकण्यास पाठवले

३) घरातली बहिण शिकल्याने क्रांती होत नाही तर सून शिकली तर क्रांती होते हे आपल्या कृतीतून जगाला दाखवणारे

४) ज्या काळात माणसाला माणूसपण समजत नव्हते त्या काळात स्री दाश्याचा तुरुंग फोडून शाळा काढणारे

५) महिलांना आत्मसन्मानाने जगणे मिळावे म्हणून दैव भोळेपणा संपवून चिकित्सा करायची शिकवण देणारे

६) अनाथ आश्रम स्थापन करून बाल संगोपन करणारे

७) विधवा आणि निराधार महिलांना आश्रय देणारे , महिला सुधारग्रह काढणारे

८) दलितांसाठी शाळा काढून शिक्षण देणारे

९) प्रौढ वर्ग सुरू करणारे

१०) सुतार ,लोहार, कुंभार यांच्याकडे युवकांना पाठवून त्यांना भारतात कुशल कारागीर बनवत , व्यवसाय शिक्षण देणारे पाहिले थोर पुरुष( skill India चे प्रणेते)

११) दुष्काळात अन्न छत्र चालवून लोकांची भूक शांत करणारे महात्मा

१२) वारीत चालणाऱ्या हजारो वारकरी यांची सेवा करणारे स्वतः ज्योतीराव आणि त्यांचे सत्यशोधक सहकारी

१३) उद्योग जगत उभे करून ,अनेक विकास कामे समृध्द करणारे महात्मा फुले

१४) देशात शिक्षण चळवळ उभी करतानाच वाचन चळवळ उभी करून लोकांना उत्तम ज्ञान देणारे साहित्य निर्माण करणारे महात्मा फुले

१५)गरोदर माता यांचे संगोपन करून त्यांना प्रसूती नंतर सन्मानाचे आयुष्य देणारे महात्मा फुले

१६) आरोग्य सोयी पूरक व्हाव्यात आणि समाजाला चांगले डॉक्टर मिळावेत यासाठी आपला दत्तक पुत्र यशवंत यास शिक्षण देऊन समाजाला डॉक्टर देणारे महात्मा फुले

१७) स्वतःचे मारेकरी म्हणून आलेले सुपारी घेणारे, महात्मा फुले यांच्या उपदेशाने पुढे पंडित झाले हे कार्य करणारे महात्मा फुले

१८)" सर्व साक्षी जगत्पती ' त्याला नकोच मध्यस्थी " सांगून इथल्या प्रत्येक व्यक्तीला सर्वात अगोदर पूजा प्रार्थेनाचा अधिकार देणारे महात्मा फुले.

१९) समतेचे पुरस्कर्ते आणि सामाजिक समरसता निर्माण करणारे महात्मा फुले

२०) माणसाला त्याच्या जातीवरून नाही तर कर्मावरून श्रेष्ठ ठरवावे हे कृतीतून सांगणारे पाहिले थोर पुरुष महात्मा फुले......

२१) स्वराज्य नायक, बहुजन प्रतिपालक, छ शिवाजी महाराज यांची समाधी शोधून पहिली जयंती साजरी करणारे आणि सुमारे २०० वर्ष शिवाजी महाराजांना ज्या लोकांनी समाजापासून दूर ठेवले त्यांच्या जयंतीचा उत्सव करणारे पाहिले लोकनायक देखील महात्मा फुले ...

युवकांनो तुम्हीच सांगा आता तुम्हाला कोण हवे आहेत , मेंदू नसलेले किडे की , सामाजिक क्रांतीचे आद्य जनक फुले?

कारण भिडे निवडले तर तुम्ही षंढ व्हावं आणि फुले निवडले तर तुम्ही बंड कराल आणि सामाजिक कार्यासाठी पेटून उठाल 👏🏻

*अमर हजारे (युवा व्याख्याते)*

आंदोलक पहिली मुलींची शाळा

आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य

Post a Comment

Previous Post Next Post