थोर पुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा. .. प्रा.सदानंद माळी

बुलढाणा - दि. 31 | वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच प्रसिद्ध होऊ पाहत असलेले मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथील जाहीर सभेमध्ये स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे बाबत तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे बाबत अपशब्द वापरत वादग्रस्त विधान केले.

त्यामुळे समस्त फुले प्रेमी तथा बहुजन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे बुलढाणा शहरातील माळी समाज व समस्त पुरोगामी संघटनांच्या बांधवांच्या वतीने दिनांक 31 जुलै 2023 रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन व तहसीलदार साहेब येथे निवेदन देण्यात आले असुन संभाजी भिडे ही व्यक्ती नेहमी नेहमी महापुरुषांच्या बाबत वादग्रस्त विधान करीत असते. अशी व्यक्ती समाजामध्ये राहणे अत्यंत घातक आहे. यापूर्वी सुद्धा यांनी अनेक दंगली घडविल्या असून त्यांचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल सुद्धा आहेत. तरी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांना तात्काळ अटक करण्यात यावी असा इशारा देण्यात आला.

त्यावेळी शिवसेना नेते प्रा सदानंद माळी, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर बिडवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय हाडे, सम्राट संघटनेचे आशिष बाबा खरात, इंजिनीअर सुरेश चौधरी, शिवदूत रामदास काकडे, फुले ब्रिगेड चे जिल्हाप्रमुख मधुसूदन सपकाळ, महात्मा फुले उत्सव समितीचे मा. अध्यक्ष प्रदीप डांगे, सचिन मिसाळ, जगदीश मानतकर, मा ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार, इतर बहुजन समाज संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसह यांसह अन्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post