थोर पुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा

मलकापूर - दि. 31 | वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच प्रसिद्ध होऊ पाहत असलेले मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथील जाहीर सभेमध्ये स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे बाबत तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे बाबत अपशब्द वापरत वादग्रस्त विधान केले.

त्यामुळे समस्त फुले प्रेमी तथा माळी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे मलकापूर, खामगाव शहर माळी समाज बांधवांच्या वतीने दिनांक 31 जुलै 2023 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन व तहसीलदार साहेब येथे निवेदन देण्यात आले असुन संभाजी भिडे ही व्यक्ती नेहमी नेहमी पुरुषांबाबत वादग्रस्त विधान करीत असते अशी व्यक्ती समाजामध्ये राहणे अत्यंत घातक आहे.

Ko

यापूर्वी सुद्धा यांनी अनेक दंगली घडविल्या असून त्यांचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल सुद्धा आहेत. तरी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणी त्यांची सभा होऊ न देणे असा इशारा देण्यात आला त्यावेळी मलकापूर येथून खामगाव रवाना झाले सभास्थळी गेल्यावर खामगाव, मलकापूर येथील माळी बांधवांनी दांगडो घातला आणि बाचाबची होऊन पोलीसांनी आम्हाला अटक करण्यात आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post