राज्य सत्यशोधक परिषदे तर्फ बळीराजाचा गौरव

पातोंडा(भगवान रोकडे) दि. 09 |- भारतीयांचे वास्तव विधायक पूर्वसंचित असलेला कृति, प्रकृती आणि संस्कृती यांचे तजेलदार माहेर म्हणजे महान सम्राट बळीराजा यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम राज्य सत्यशोधक परिषदे तर्फ पातोंडा ता. चाळीसगाव येथील शिवदत्त मंदिरात सकाळी नऊ वाजता आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटक मा. शेनपडू निंबा पाटिल, मा.उत्तम नामदेव महाजन, मा. सच्चिदानंद जाधव, मा. धनराज सुकन झगडे, मा.भरत सितारम अहिरे यांच्या हस्ते समस्त बहुजन समाजाचे दैवत खंडेराव महाराज यांची तळी भरून करण्यात आले. पातोंड्याचे माजी सरपंच अनिल ऊर्फ आबा महाजन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते.

या प्रसंगी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष कैलस जाधव व राज्यस्तरीय सत्यशोधक परिषदेचे कार्यकर्ते भगवान रोकडे यांनी सम्राट बळीराजा यांचे जीवन कार्य व बळी संस्कृती यांच्यावर आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सोसायटीचे चेअरमन सुभाष फकीरा माळी, संजय बळीराम महाजन, लक्ष्मण दौलत झगडे, आण्णा पाटील, भोला कुमावत, शालीक आल्हाटे, साहेबराव माळी, भगवान झगडे, एकनाथ महारू माळी, पोपट आल्हाटे, दत्तात्रय आप्पा देशमुख, नामदेव सदाशिव माळी इत्यादी मन्यावर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोविंद वाघ यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post