काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते अजय तायडे यांचा सत्कार

शेगाव- दि. ०८ | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा आ. श्री नानाभाऊ पटोले हे दौऱ्यावर आले असता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्ष नेते ज्ञानेश्वरदादा पाटिल यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मा. आ. राहुलभाउ बोंद्रे होते यावेळी मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले .

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबिसी विभागाच्या सचिव पदी अजय तायडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल प्रांताध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजेशजी एकडे, प्रदेश उपाध्यक्ष संजयजी राठोड, सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटिल, जेष्ठ काँग्रेस नेते मुखत्यारसिंहभाऊ राजपूत, जेष्ठ काँग्रेस नेते दयारामभाउ वानखडे, प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर, अॅड जयश्रीताई शेळके, रामविजयजी बुरुंगले , धनंजय देशमुख, जाहेद अली खान, महीला काँग्रेस अध्यक्षा सौ ज्योतीताई ढोकणे,

डाॅ. अरविंद कोलते, प्रकाशभाऊ पाटील , नगराध्यक्ष कासमभाई गवळी , युवक काँग्रेस चे मनोज कायंदे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रा. गजानन खरात , सेवादल चे अध्यक्ष तेजेंद्रसींह चव्हाण, शहराध्यक्ष किरण बापू देशमुख, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, अशोकराव हिंगणे , विद्यार्थी काँग्रेस चे अध्यक्ष शैलेश खेडेकर , जयंतराव खेळकर , कैलासबाप्पु देशमुख , तालुकाध्यक्ष राजू वानखडे, दिपकजी सलामपुरिया, नानाभाउ पटोले विचारमंच चे अध्यक्ष दिलीप पटोकार, यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post