हुनर की इज्जत तब होती है जब वो किसी के भलाई के लिऐ इस्तमाल किया जाये- मोनिका काळे

मुंडगाव - अकोट-  दि 7 नोव्हेंबरला दिवाळी भाऊबीज सोहळ्याचे औचित्य साधून श्री.गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव मधील आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान लेकींचा गावाच्या वतीने गौरवसत्कार करण्यात आला...

तसेच "महिमा मुंडगावचा" व "अस्तित्व" या लघुचित्रपटाचे अनावरण सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते (चला हवा येऊ द्या फेम) मा.श्री.भारतजी गणेशपुरे सर व सौ.अर्चनाताई गणेशपुरे (सपत्नीक) यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्याच गावात आपला कर्तृत्वाचा सत्कार होण हि खर तर माझ्यासाठी आणी आई-वडिलांसाठी गर्वाची व अभिमानाची बाब आहे मी सदैव या जन्मभूमीच्या ऋणात राहिलं आणी आपण ठेवलेला विश्वास आणी आपण केलेला माझा सन्मान कायम स्मरणात राहील. आणी या पुढेही या जन्मभूमी ला कर्मभूमी मानून आपल्या गावाच्यासाठी तळमळीने सर्वात पुढे राहील ही आज शब्द देते आणि सत्कारमूर्ती व सूत्रसंचालन (दुहेरी) भूमिका दिल्या बद्दल मी गावकऱ्यांचे आणि आयोजकांचे आभार मानते.

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक, श्री.भारतजी गणेशपुरे,(चित्रपट अभिनता) कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.उद्धवरावजी गाडेकर दादा, (गुरुकुंज आश्रम मोझरी) प्रमुख अतिथी श्री.रमेशजी थोरात,(ज्येष्ठ रंगकर्मी व सदस्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ महाराष्ट्र शासन) श्री.अशोकजी मानकर,(चित्रपट संवाद लेखक तथा गीतकार) गायत्री बालिका आश्रमचे संचालक श्री.सुधाकरजी गिते, संचालीका श्रीमती आश्विनीताई सुजदेकर, सौ.अर्चनाताई भारतजी गणेशपुरे श्री.पंकजजी साबळे अकोला तथा थोर मोठे वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी, मित्रपरिवार, गुरुजन सर्व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.!!!

Post a Comment

Previous Post Next Post