महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओ बि सी विभाग सचिवपदी अजय तायडे यांची निवड

खामगाव - दि. ०६ | सामाजीक कार्यात सदा अग्रेसर असणारे तथा काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करणारे अजय काशिराम तायडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ( ओ बि सी सेल ) च्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे .

काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा नानासाहेब पटोले यांचे नेत्रुत्वात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओ बि सी सेलचे अध्यक्ष भानुदासजी माळी यांनी ही नियुक्ती केली असून नुकतीच या नियुक्तिला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ( ओ बी सी सेल ) च्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे. अजय तायडे यांचा परिवार सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाशी जुळलेला आहे. ते एकनिष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम करीत आहेत.

सामाजिक व राजकिय क्षेत्रात कार्यरत असतांना त्यांनी बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रात आपले वलय निर्माण केले आहे. सर्वच जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते त्यांचे संपर्कात असतात. त्यासोबतच दिवसभर सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व कामात सहकार्य करीत असतात. त्यामुळे हसतमुख असणारे व्यक्तीमत्त अजय तायडे यांच्या सामाजिक, राजकिय कामाची व निष्ठेची दखल घेऊन काँग्रेस पक्षाचे माध्यमातून ओ बी सी विभागाचे प्रदेश सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना जनमानसात आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रांतीसुर्य न्युज तर्फे त्यांना खुप खुप शुभेच्छा ....

Post a Comment

Previous Post Next Post