जिल्हा परिषद माळकरंजा शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

कळंब, जि. धाराशिव - दि. 30 | तालुक्यातील माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चि.रोहित लालासाहेब शितोळे, प्रथमेश नरसिंग गोडसे, अंजली शहाजी लोमटे, विराज विजय शिंदे, तनुजा बालाजी पुदंगे, आर्यन सर्जेराव लोमटे, समीक्षा बालाजी निकम, किर्ती पुरुषोत्तम मोहिते यांनी यश मिळवले.या विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रम शील शिक्षक श्री हनुमंत घाडगे, श्रीमती भारती सुर्यवंशी,समिना बागवान, यांनी मार्गदर्शन केले.सातत्य आणि वर्षभर सतत सराव, चाचण्या घेतल्या मुळे हे यश आले.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षक बांधवांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. गटशिक्षणाधिकारी तथा बीटचे विस्तार अधिकारी श्री मधुकर तोडकर, मुख्याध्यापक श्री संतोष भोजने, सरपंच तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विजय व्यंकटराव शिंदे, उपाध्यक्ष श्री नरसिंग गोडसे, उपसरपंच श्री शरद गालट यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post