महात्मा फुलेंवर बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून खामगावातील कार्यक्रम रद्द करण्याबाबत पोलिस निरीक्षकांकडे माळी समाजाची तक्रार

खामगाव - दि. ३० | अमरावती येथील एका कार्यक्रमात समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांच्या बद्दल आक्षपार्ह व बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून ३१ जुलै ला घाटपुरी, खामगाव येथे होणारा कार्यक्रम रद्द करावा, अशी तक्रार सकाळ माळी समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक यांना करण्यात आली.

सदर तक्रारीमध्ये पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. "उपरोक्त विषयान्वये आम्ही तक्रार घखल करतो की, मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे हा इसम विकृत मनोवृतीचा असून तो नेहमी अनेक महामानवा बद्दल गरळ ओकत आहे. नुकतेच अमरावती येथील जाहीर कार्यक्रमात आमचे व समस्त भारतवासियांचे आराध्य दैवत क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे बदल अपशब्द बोलून गरळ ओकली आहे. त्यांच्या या विकृत मनोवृत्तीचा आम्ही निषेध करीत आहोत. आमच्या समाजभाव‌ना दुखाव अमरावती येथील कार्यक्रमाच्या व्हिडिओ क्लीपची चौकशी करून जातीजातीत तेठ निर्माण करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिड़े याचेवर गुन्हा दाखल करून उद्या घाटपूरी, खामगांव येथे 31-07-2053 रोजी होणारा कार्यक्रम रद्द करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईन. घ्याची कृपया नोंद घावी. ही नम्र विनंती." यावर समस्त सकल माळी समाज यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post