राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त विविध भरगच्च सामाजिक कार्यक्रम साजरा होणार

नाशिक/येवला - दि. 15 (जिल्हा विशेष प्रतिनिधी -डॉ. शेरूभाई मोमीन,येवला ). येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार, विकास पुरुष कार्यसम्राट, नाशिक जिल्हा भाग्यविधाते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ साहेब, यांचा  शनिवार दि.15 ऑक्टोंबर रोजी, 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक भरगच्च कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.

भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा भव्य वृक्षारोपण सायकल रॅली येवला उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप शालेय विद्यार्थ्यांना मिठाई व फळे वाटप, तसेच 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्ताने नाशिक येथील भुजबळ फॉर्म येथे अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

तरी अभिष्टचिंतन सोहळ्यास व कार्यक्रमास भावी वाटचालीस कार्यास हार्दिक मनः पूर्वक हार्दिक शुभेच्छा.. श्री.उद्धव पवार श्री. नारायणराव आठशेरे यांच्या वतीने करण्यात आलेले आहेत. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदराव पवार जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ना. फारुख अब्दुल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सौं. मीना ताई छगनराव भुजबळ खा. सुप्रियाताई सुळे खा. सुनील तटकरे, केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले, ना. अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी खा. समीर भुजबळ आ. पंकज भुजबळ, यांच्यासह आदी हेविवेट नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संपूर्ण राज्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक वैज्ञानिक आणि सर्व हितचिंतक कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post