अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती ठाणे शाखेची कार्यकारिणी जाहीर

ठाणे - दि. १२ | अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाळीस वर्षांपासून महाराष्ट्रात जनप्रबोधनाचे काम करीत आहे. समितीच्या ठाणे शाखेची कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया पार पडली आहे.

दिनांक ९/१०/२०२२ रविवार, या दिवशी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या नियमित कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. नवीन वर्षात करावयाचे कार्यक्रम व नवीन वर्षात काम करणाऱ्या कार्यकारणीची निवड करणे, या प्रमुख दोन मुद्द्यांवर सभेमध्ये चर्चा करण्यात आली.

या बैठकीत नवीन वर्षाच्या कार्यकारणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. सर्वानुमते निवड झालेले सदस्य पुढील प्रमाणे डॉ. प्रकाश ढोकणे (अध्यक्ष), यशवंत सपकाळे (संघटक), नीता डुबे (महिला संघटिका),दादाजी यशवंतराव(सचिव), रवींद्र रहाटे (कोषाध्यक्ष), प्रीती कुथे (युवा संघटक),

शिवा कमलापुरे (प्रसिद्धी प्रमुख), डॉ. प्रकाश सावंत (उपाध्यक्ष), मकसूद शेख (सह संघटक), चेतन दावेदार (सहसचिव), सानिका शेटे (महिला सह संघटिका), शैलेश सोनावणे (सहप्रसिद्धीप्रमुख), सिद्धार्थ सपकाळे (युवा सह संघटक) अशा प्रकारे पदाधिकाऱ्यांची निवड झाली. सदस्य म्हणून रेड्डी कांबळे, प्रांजल जाधव, रावसाहेब खेडकर, शरद माने, कुंडलिक चौधरी, लक्ष्मण मोरे, सोमनाथ कोळेकर व नरेश भोईर यांची निवड झाली.

तसेच सल्लागार म्हणून डॉ. हर्षा गोयल व डॉ. गोकुळदास अहिरे यांची निवड झाली. निवड झालेल्या सर्व सदस्यांना त्यांच्या जबाबदारी विषयी माहिती देऊन पुढील वर्षाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post