आत्मीयता क्लिनिक येथे संविधान दिन साजरा

नाशिक- दि. 26 नोव्हेंबर | आत्मीयता क्लिनिक व प्रीटी यु फौंडेशन गणेश नगर येथे संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाप्रती जागरूकता निर्माण होण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात संस्थेचे सदस्य श्री. प्रसाद पवार यांनी परिसरातील उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. संविधान निर्मितीची प्रक्रिया, संविधान विषयी माहिती देण्यात आली. संविधानात असलेल्या कलम, कायदे, कार्यप्रणाली विषयी माहिती दिली. तसेच संविधानाचे महत्त्व सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीतील योगदान सांगितले. संविधान दिन साजरा करण्याचे महत्त्व सर्वाना सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानातील उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अनिता बेंडाळे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. प्रियंका बेंडाळे तसेच सदस्य जयश्री पवार, विष्णू दवणे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post