क्रांती ज्योती सावित्रीच्या श्वेत रंगात होऊ दंग तिच्याच मुळे होतोय आज महिलांचा नवरात्र एक संग
क्रांती केली शिक्षणाची दूर करण्या अंधेरा साथ होती ज्योतिबाची झगडली अन्यायाशी
घेतली उंच भरारी बनली स्त्री करारी स्त्रियांच्या शिक्षणाची महान नायिका ज्ञान ज्योती
स्त्रियांच्या हक्कांसाठी ज्ञान ज्योत ती घेऊन दिले ज्ञान घरोघरी पेटविली ती मशाल
तिने स्त्रिया च्या प्रगतीची केली सहन बोलणे विष्ठा,शेण ही झेलले जुमानता न कुणाला
जातिभेदाचा धोंडा पायतळी तुडवून घडविली इथली नारी ना कधी झुकणारी
देश विदेशात शिकताय मुली ज्ञानसागरी मुक्त संचार करती सवित्रीमुळे तव क्षितिजे विस्तारली तुम्हीच शिक्षणाच्या आदर्श हाच तुमचा सन्मान
डॉ. अनिता बेंडाळे नाशिक
Post a Comment