शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा पुतळा बसवण्यात यावा - माळी समाजाचे शिष्टमंडळ

चाळीसगाव (भगवान रोकडे) - ८ ऑक्टोबर २०२१ संध्याकाळी ४:३० वाजता चाळीसगाव विधानसभेचे आमदार मा. मंगेश चव्हाण, माजी आमदार मा. राजीव देशमुख साहेब यांना राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांचा पुर्णाकृती पुतळा चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सत्यशोधक विचार मंच व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे सर्वांना सतत समस्त बहुजन समाज बांधवांना प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या चाळीसगाव नगरपालिकेच्या दर्शनी जागेवर राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी मागणी केली आहे. सदर निवेदन देवतांना प्रा. गौतमजी नीकम, भगवान राजपूत, रामचंद्र जाधव, राजेंद्र चौधरी, रोशन जाधव, प्रदिप सत्यवान राजपुत, सदाशिव गवळी, भिमराव खलाणे, सचिदानंद जाधव, भगवान रोकडे, आबा पहिलवान, प्रकाश माळी, लोकनियुक सरपंच बापूसाहेब पांडूरंग माळी, भगवान महाजन, कैलास जाधव, देविदास माळी, भोला कुमावत, प्रवीण पाटील, इत्यादींच्या उपस्थितीत नीवेदन देण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post