खामगाव-२४ सप्टेंबर | श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थी निशांत ज्योती अजय तायडे याने शेतकऱ्यांना ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (Rural Awareness Work Experience) अंतर्गत ग्राम ढोरपगाव येथे शेती संबंधित ई - पीक पाहणी या विषयावर मार्गदर्शन केले.
- ई पीक पाहणी म्हणजे काय? आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्याची नोंद ही तलाठी यांच्यामार्फत केली जात होती.
- प्रत्यक्ष गटात न जाता शेतकरी ज्या पिकाची नावे सांगेल त्याच पिकाचा पेरा झाला असे ग्राह्य धरुण त्याची नोंद होत असे.
- त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना शेतकरी व अधिकारी यांना करावा लागत होता.
- अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पीक एक , तर नोंदनी दुसऱ्या पिकाच्या केल्या जात होती. त्यामुळे नोंद झालेल्या पिकाचे पेऱ्याबाबत, व होणारे संभाव्य उत्पादन याबाबत अचूक माहिती उपलब्ध होत नव्हती. ते या ॲपमुळे शक्य होणार आहे.
- शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचू्क नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने 'ई-पीक पाहणी' अॅप निर्माण करण्यात आले आहे.
- यामाध्यमातून शेतकऱ्याने कोणत्या गटामध्ये कोणते पिक घेतले आहे याची नोंद तर होणारच आहे शिवाय ते ठिकाणही अक्षांश / रेखांशमध्ये नोंद केले जाणार आहे.
सदर कार्यक्रमाकरीता प्राचार्य डॉ. नंदकिशोरजी चिखले सर, प्रभारी प्रा. आर. के.पाटील सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. विरेंद्र डेरे सर आणि विषय तज्ञ सर्वश्री सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
Post a Comment