खामगाव- २४ सप्टेंबर | श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थी निशांत ज्योती अजय तायडे याने शेतकऱ्यांना ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (Rural Awareness Work Experience) अंतर्गत शेती संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
त्यामध्ये माती परीक्षण, बीज प्रक्रिया, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, तसेच तन, बुरशी, कीटक, व अन्य रोगांवर नियंत्रण करणे याबाबत माहिती दिली व मित्रकिटके कशे ओळखायचे याबाबत शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. शेतीकरिता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कश्या प्रकारे करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली.
सदर कार्यक्रमाकरीता प्राचार्य डॉ. नंदकिशोरजी चिखले सर, प्रभारी प्रा. आर. के.पाटील सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. विरेंद्र डेरे सर आणि विषय तज्ञ सर्वश्री प्रा.डॉ. दुर्गे सर, कणसे मॅडम, किर्डे सर, कोचे मॅडम,साबळे सर, यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
Post a Comment