परभणी (विठ्ठल तळेकर)- २३ ऑगस्ट | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्ह्याचे निरिक्षक व प्रदेश सरचिटणीस मा. बसवराज पाटील नागराळकर व जिल्हाध्यक्ष मा आ बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली आहे. यावेळी पक्ष निरीक्षक नागराळकर यांनी आढावा बैठकी दरम्यान सर्व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज होण्यास सांगितले.

परभणी जिल्ह्यात होऊ घातलेल्या महापालिका, नगर पालिका,पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा फार मोठा मतदार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेत एकहाती सत्ता मिळवेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस परभणी जिल्ह्याचे निरीक्षक मा.बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.
निरीक्षक साहेबांशी पक्ष वाडीसाठी काही विनंती पूर्वक सूचना केल्या सोबत सर्व सेलच्या पदाधिकारी उपस्थीत होते. यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी साहेब, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, ओबीसी सेल प्रदेश संघटन सचिव प्रा विठ्ठल तळेकर, सभापती पंकज आंबेगावकर, तुकाराम गोंगे, संतोष लाडाने, जुबेर शेख, पाशा पटेल, भडके कृष्णा शिंदे, इत्यादी उपस्थित होते.
Post a Comment