ओबीसी नेते प्रा सदानंद माळी यांनी आज वडिगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाओ उपोषणास दिली भेट

बुलढाणा- दि. १९ | वडीगोद्री ता अंबड जिल्हा जालना येथे ओबीसी आरक्षण बचाव साठी आमरण उपोषणाला बसलेले प्रा. लक्ष्मण हाके सर व नवनाथ आबा वाघमारे यांची समता परिषदेचे राज्य सल्लागार प्रा. सदानंद माळी, दलितमित्र माधवराव हुडेकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ खांडेभराड, इंजि. नारायण बळी व असंख्य ओबीसी बांधवांना ओबीसी योद्धा प्रा. लक्ष्मण हाके सर, व नवनाथ वाघमारे यांची वडिगोद्री येथे जाऊन उपोषणास दिली भेट.

ओबीसी आरक्षण बचाव साठी वडिगोद्री येथे सुरु असलेल्या उपोषणास भेट देऊन "आम्ही सर्व ओबीसी तुमच्या कायम सोबत. आहोत हा शब्द दिला व उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढविले." यावेळी प्रा. सदानंद माळी यांनी सर्व ओबीसी बांधवांना विनंती केली की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी प्रा लक्ष्मण हाके सर यांना भेटून ओबीसी आरक्षण बचावा मध्ये आपले सुद्धा योगदान द्यावे, यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा. ज्यांना शक्य होईल त्यांनी आर्थिक मदत करा असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post