लालपरी वाचवण्यासाठी काँग्रेसच्‍या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली प्रतिकात्‍मक बस

खामगांव - दि. २५ | लालपरी या नावाने ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्याच्या परीवहन विभागाची बस ही ग्रामीण भागातील जिवन वाहीनी आहे. हिच लालपरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरली आहे. लालपरी (एस टी) चे अतुट नात निर्माण झाले आहे . ह्याच एस टी ला आज अखेरची घरघर लागलेली दिसत आहे . दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत . एस टी ला चांगले टायर नाहीत, एक्सेल तुटण्याच्या घटना घडत आहेत, स्टेअरींग लाँक होते तर कधी ब्रेक फेल होतात.

अशा अनेक अडचणींचा सामना करत चालक वाहक सेवा देत आहेत. सोबतच एसटी बसेसची संख्या आवश्यकते पेक्षा खुपच कमी आहे. याचा थेट परिणाम एस टी ने दररोज प्रवास करणारे ग्रामीण भागातील शेतकरी व शाळा , महाविद्यालयात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.

ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी, जुन्या भंगार बसेस बंद करून नविन बसेस उपलब्ध करून द्याव्यात ह्यासाठी सरकारचे लक्ष वेधन्यासाठी खामगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादला चे कार्याध्यक्ष तेजेंद्रसींग चव्हाण यांचे नेत्रुत्वात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबिसी विभागा चे सचिव अजय तायडे यांचे प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी व परिवहण विभागाचे आगार प्रमुख यांचे मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन, प्रतीकात्मक बसेस भेट दिल्या आहेत.

सध्याच्या सत्ताधारी विरोधात असतांना एसटी चे बाबतीत मोठमोठ्या गप्पा मारत होते, मात्र सत्तेत आल्यावर त्यांना एसटी चा विसर पडला आहे. ही परिस्थिती असीच राहिली तर काँग्रेस पक्षाचे वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

यावेळी काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे जिल्‍हाध्यक्ष अमित तायडे, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष साहिल देशमुख, शहराध्यक्ष सौरभ रिछारिया, चेतन काकडे, शुभम मोरे, हरिसिंग चव्‍हाण, केतन चव्‍हाण, ओम दहिभात, दत्‍ता भिल, चेतन धोत्रे, अविनाश दांदळे, गोपाल वाघ, ऋषीकेश कोकाटे, दुर्गेश खोडके, विशाल गाडे, सचिन सरदार, हरिओम हिवरखेडे, वाल्‍मीक वनारे, चेतन चव्‍हाण, अभिषेक धोत्रे, निरजंन तायडे, दत्‍ता पानझाडे, प्रदीप पानझाडे, शादब अली यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post