राष्ट्रद्रोही भिडेंना घटनास्थळी वाहून नेणाऱ्या प्रस्थापितांची गय केली जाणार नाही.

खामगाव - दि. 31 | संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याची सुपारी घेऊन फिरणारा राष्ट्रद्रोही मनोहर कुलकर्णी यांची खामगाव येथील सभा पार पडली. या सभेला जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध झाला होता. सभेची परवानगी नाकारण्यात यावी यासाठी अखंड महाराष्ट्र एकजुटला होता.

महापुरुषांच्या विचारधारेचा वारसा जपणारा हा महाराष्ट्र या सभेचा आणि राष्ट्रद्रोही भिडेंचा निषेध करत होता. जनतेचा हा आक्रोश पाहून भिडेंना सभेच्या ठिकाणी पोहचायला पोलिस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे, हे लक्षात येताच ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल जाहीर बेताल वक्तव्य केले असे विकृत, मनोरुग्ण मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांना घटनास्थळी पोहचविण्यासाठी दस्तुरखुद्द आमदार साहेबांनी आपल्या स्वतःच्या वाहनातून सभा स्थळी पोहचतात हे पाहून त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे मुखवटे उतरून खरे चेहरे बाहेर आले आहेत. विचारधारा म्हणून आपण शून्य आहात हे अखंड महाराष्ट्राने आज उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.

माळी समाजाचा वापर फक्त आणि फक्त वोट बँक म्हणून करण्यात येत आहे हे आज पूर्णपणे सिध्द झालंय. माळी समाजाच्या विश्वासाचा गळा दाबण्याचे काम प्रस्थापित आमदार आणि सरकार करत आहे. एकीकडे सामान्य रुग्णालय खामगाव याला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात यावं असे ढोंग करून माळी समाजाच्या भावनांशी खेळता आणि आज त्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांचे रखवालदार बनून पुढे येता. अशा प्रस्तापित आमदारांना माळी समाज येत्या निवडणुकीत त्यांची जागा आणि लायकी दाखवल्या शिवाय राहणार नाही. आज तुमचा दुटप्पीपणा जनतेसमोर आलाय.

त्यामुळेच सकल माळी समाज तथा महापुरुषांच्या विचाराने प्रेरित झालेला जनसमुदाय तुम्ही केलेल्या या समाजविरोधी कामाचा निषेध करेल. मी संजय बगाडे सचिव, सत्यशोधक जनसेवा समितीच्या वतीने राष्ट्रद्रोही मनोहर भिडे आणि त्यांना साथ देणारे दगाबाज आमदार यांचा जाहीर निषेध करतो. असे बगाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post