जि प शाळा माळकरांजा येथे महाराष्ट्र दिन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

कळंब, जि. धाराशिव - दि. 1 | तारीख एक मे तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावचे सरपंच तथा शालेय समिती अध्यक्ष श्री विजय व्यंकटराव शिंदे यांच्या हस्ते ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शालेय प्रांगणात मुख्याध्यापक श्री संतोष भोजने व उपसरपंच श्री शरद गालट यांच्या समवेत ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्र प्रज्ञाशोध अर्थात मंथन परीक्षेत यश मिळविलेल्या इयत्ता दुसरीच्या कुमारी आर्या विजय शिंदे, अर्पिता वैजनाथ लोमटे, अमृता जगदीश लोमटे, इयत्ता तिसरीतील मंजुषा शहाजी लोमटे चौथा तील वीरसिंह जिवनसिंह ठाकुर, इयत्ता सहावीतील ज्ञानेश्वरी सुरेश यादव, स्वप्नील विठ्ठल कापरे, आदित्य नरसिंग क्षीरसागर इयत्ता सातवीच्या वैष्णवी धनाजी भोपी, स्नेहा नरसिंग गोडसे यांचा सत्कार गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विजय व्यंकटराव शिंदे, ग्रामपंचायत उपसरपंच श्री शरद गालट, माजी सरपंच विलास आबा मोहिते, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री नरसिंग गोडसे, मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष भोजने यांचे हस्ते पुष्पहार व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक श्री हनुमंत घाडगे यांनी केले.कार्यक्रमास शाळेतील शिक्षिका श्रीमती भारती सुर्यवंशी,समिना बागवान यांच्या सह सर्व विद्यार्थ्यी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post