वडगाव निंबाळकर येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रम संपन्न

वडगाव निंबाळकर - दि.10 | येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा 126 वा स्मृतिदिन अब अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय श्री. संजय ऊर्फ संजुमामा टिळेकर, सत्यशोधक फेडरेशन, समाज क्रांती व स्वराज्य क्रांती उद्योग समुह, यांनी माळी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण युवक व युवतीना तळमळीने मार्गदर्शन केले. समाजातील मतभेद बाजूला ठेवून सम विचारी माणसं एकत्रित येऊन व्यवसाय कसा सुरू करायचा, माल उत्पादन कसा करायचा, उत्पादन माल मार्केटिंग कसा करायचा, भागभांडवल राखून नफा कसा मिळवायचा, या विषयी सर्व मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास संत सावतामाळी देवस्थान समितीचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक श्री. गणेश हिरवे यांनी केले. श्री. संतोष यादव पुणे जिल्हा सरचिटणीस समता परिषद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. निलेश आगम यांनी या कार्यक्रमाला आलेल्या सर्वांच मनापासून आभार मानले.

या कार्यक्रमासाठी चांगल स्वराज्य उद्योग समुह पार्टनर, श्री. हनुमंत बनकर, श्री. अतुल रासकर कार्यकारिणी सदस्य समता परिषद, श्री.बाळासाहेब शिंदे उपसरपंच करंजे, श्री नारायण गिरमे, श्री. दत्तात्रय गिरमे, श्री. हेमंतनाना ढोले, श्री, दत्तात्रय बनकर, श्री. मुरलीधर हिरवे, श्री. सतीश लोणकर, श्री.दत्ता नेवसे, श्री. गणेश हिरवे, श्री. लालासो आगम, यांच्या प्रमुख उस्थितीतीसह ज्येष्ठ मंडळी, महिलावर्ग, तरुण युवक-युवती वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post