भुजबळ कुटुंबाची शिर्डीला भेट, सीईओ बानायात कडून सन्मान.

शिर्डी - दि ०५ | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी आज शिर्डी येथे साई मंदिरात श्री साईबाबा यांचे दर्शन घेतले. यावेळी श्री.साईबाबा शिर्डी संस्थांच्या सीईओ भाग्यश्री बानायात यांनी श्री साईबाबा यांची मूर्ती व शाल देऊन त्यांचा सन्मान केला.

यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ यांनी श्री साई बाबा यांचे दर्शन घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post