अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त कर्णबधिर मुलांना शालेय वस्तूंचे वाटप

नाशिक,दि.१ नोव्हेंबर :-* अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा आज ३० वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आज नाशिक शहरातील जागृती कर्णबधिर निवासी विद्यालय येथील विद्यार्थ्यांना प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या हस्ते व प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर यांच्या संकल्पनेतून शालेय वाटप करण्यात आले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, हर्षल खैरनार, धीरज बच्छाव, ॲड.चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी, जागृती कर्णबधिर निवासी विद्यालयाचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची दि.१ नोव्हेंबर १९९२ रोजी स्थापना करण्यात आली. आज या संघटनेला ३० वर्ष पूर्ण झाले असून हा ३० वा वर्धापन विविध सामाजिक उपक्रमातून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर यांच्या वतीने जागृती कर्णबधिर निवासी विद्यालय मखमलाबाद नाशिक येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post