कळंब (ता.8) तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना साक्षरतेचे महत्व समजावण्यात आले. तसेच साक्षरता दिन साजरा करण्यामागील उद्देश सहशिक्षक श्री हनुमंत घाडगे यांनी विशद केला.[ads1]
या साक्षरता दिनानिमित्त माळकरंजा येथील गणेश मंडळाने जमा केलेल्या वर्गणी मधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही आणि पेन असे लेखन साहित्याचे वाटप यावेळी केले. सदरील कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य श्री विजय व्यंकटराव शिंदे यांच्यासह शालेय समितीचे सर्व सदस्य गणेश मंडळाचे सर्व सदस्य शाळेतील सहशिक्षिका श्रीमती बागवान एस जी, श्रीमती सूर्यवंशी बीसी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हनुमंत घाडगे यांनी केले तर मुख्याध्यापक श्री संतोष भोजने यांनी समारोपामध्ये गणेश मंडळांनी विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करून हा एक वेगळा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे असे म्हणून गणेश मंडळाचे आभार मानले.
Post a Comment