जी.प. माळकरंजा शाळेत सत्यशोधक स्थापना दिन साजरा

कळंब- दि . २४ | तालुक्यातील मौजे माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा 150 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष भोजने यांनी सांगितले की, सन1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी आजच्याच दिवशी सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना केली. दिन, दलित, शूद्र, अति शूद्र, गोरगरीब समाजाला न्याय, समता आणि बंधुता मिळावी यासाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले.

सत्यशोधक समाजामुळेच आज आपल्याला शिक्षणामध्ये स्थान मिळालेले आहे. सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांची पहिली संघटना स्थापन केली. शेतकऱ्यांची संघटना सुद्धा स्थापन करण्यात आली. अशा पद्धतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्यशोधक चळवळ जनमानसापर्यंत पोहोचवली. आ

जही खऱ्या अर्थानं या चळवळीचे विचार आपल्या सर्वसामान्य समाजाला पुढे नेऊ शकतात. सर्वांनी सत्यशोधक समाजाचे विचार आपल्या जीवनात आणून आपला विकास साधावा असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हनुमंत घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती भारती सूर्यवंशी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post