पातोंडा येथे सत्यशोधक समाज वर्धापन दिन साजरा

पातोंडा, ता चाळीसगाव- दि. २४ | येथे सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण उत्सव (वर्धापन दिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक समाज संघ, अ. भा. भारतीय महात्मा फुले समता परिषद चाळीसगाव, सत्यशोधक विचार मंच, मुळनिवासी बळीरजा गृप, फुले दांपत्य स्मारक समिती पातोंडा येथील इ. विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी गावात नगरप्रदक्षिणा (रॅली) काढण्यात आली या नगरप्रदक्षिणा मधे माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद कन्या व बॉईज शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या नगरप्रदक्षिणेचा ग्रामपंचायतच्या भाव्य पटांगणावरती समारोप करण्यात आला.

समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतिष महाजन सर, यावेळी मा. सभापती संजय पाटील, शिवव्याख्याते मा. प्रदिप देसले सर, दाभाडे सर तसेच विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कैलस जाधव सुत्रसंचालन भगवान रोकडे तर आभार श्री आधार रामदास महाजन सर यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील शरद महाजन, विकास सोसायटी चेअरमन विजयकुमार माळी, विजय पांडुरंग माळी, मुळनिवासी बळीराजा गृपचे अध्यक्ष गोविंदराव वाघ, आरोग्य दूत डाॅ. विश्वजीत पाटील, माजी सरपंच आबा महाजन, सच्चिदानंद जाधव, संजय बळीराम माळी, मा. जिप सदस्य शेनपडू पाटील, भगवान महाजन, अनिल महाजन, विश्वासराव देशमुख, कैलास माळी, भरत अहिरे, भगवान अहिरे, कैलास झगडे,जगन्नाथ बापू, दत्तात्रय साबळे, विलास माळी, दगा जिभू व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post