सावित्री ब्रिगेडचा : जागर स्त्रीशक्तीचा

नागपूर - दि. 01 |  इतिहासाच्या पानावर ज्या महानायिकांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे, त्या कर्तृत्ववान नायिकांचे स्मरण म्हणून नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून "जागर स्त्रीशक्तीचा" हा कार्यक्रम सावित्री ब्रिगेड नागपूर महाराष्ट्रनी आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ, रजिया सुलतान ,सावित्रीआई फुले, फातिमा शेख, लोकमाता अहिल्याबाई होळकर, त्यागमूर्ती रमाई, डॉ.ॲनी बेझंट, इंदिरा गांधी इत्यादी महानायिकांवर एकपात्री नाट्य प्रयोग स्पर्धा, काव्यरचना स्पर्धा तसेच प्रबोधन असे याचे स्वरूप आहे. सर्वत्र चर्चा असलेला क्रांतिकारी अशा या आगळावेगळ्या नवरात्र उत्सवाची संकल्पना सावित्री ब्रिगेडच्या अध्यक्षा, डॉ.स्मिता निशिकांत मेहेत्रे यांची आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमच्या भगिनी पुस्तकांचे वाचन करतील आणि युवा पिढी या महानायिकांच्या प्रेरणेने आपली वाटचाल प्रकाशमान करतील हाच उद्देश या नवरात्र उत्सवाचा आहे असे डॉ. स्मिता मेहेत्रे म्हणाल्या

[caption id="attachment_4701" align="aligncenter" width="519"] प्रबोधन करताना डॉ. स्मिता मेहेत्रे नागपूर[/caption]

प्रगती मानकरांचे मार्गदर्शन तसेच शुभांगी डांगरे, डॉ. सुवर्णा येवले, उज्वला पाटील, प्रणोती कळमकर, सविता आवारे, रेखाताई मालपुरे, डॉ. दीपा हटवार, सुमती देवताळे, शितल बनसोड, ॲड. रोमा खंडवानी, संगीता लंगडे, स्मिता भिमनवार, मालती वराडे, शितल सोनवणे, वंदना घाबर्डे, डॉ. ज्योती नागपूरकर, शारदा पाटील, लता मेश्राम, डॉ.संगीता तोडमल आदी देश- विदेशातील भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post