समता परिषद चिटणीसपदी कैलास मुदलियार यांची नियुक्ती

नाशिक(संतोष पुंड) - दि. 29 | आज श्री. कैलास मुदलियार यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. अखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

यावेळी राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, नाशिक शहराध्यक्षा कविताताई कर्डक, महिला शहराध्यक्षा आशा भंदूरे, मीनाक्षी काकळीज, ज्ञानेश्र्वर महाजन, भालचंद्र भुजबळ, धीरज बच्छाव आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post