घरकुलाचे छत कोसळले- आदिवासी बालके थोडक्यात बचावले.

नाशिक - दि. 23 | महात्मा फुले नगर, गौंडवाडी येथील वाल्मिकी आंबेडकर योजनेतील घरकुलाचे छत कोसळून गौंड आदिवासी समाजातीलतीन बालके कसेबसे बाच्यावल्याने मोठी जीवितहानी टळली.[ads1]

यासंदर्भात आदिवासी विकास विभाग नाशिक मनपा म्हाढा यांचेकडे समता परिषदेच्या शहराध्यक्ष व मा. नगरसेविका कविताताई कर्डक यांनी मागणी करूनही तिन्ही विभाग दुर्लक्ष करीत असल्याने, भविष्यात घरे कोसळून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर विषयासंदर्भात कविताताई ह्या नाशिक महानगरपालिका प्रशासकांची दिनांक २४ जुलै ला सायंकाळी ४:३० वाजता मनापा प्रशासकांची भेट घेऊन गौंड आदिवासी समाजाच्या समस्या मांडणार आहेत.

दरम्यान समता परिषदा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी घटना स्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. गोंड आदिवासी बांधवांना त्वरित घरकुले बांधून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post