मंडल दिनाच्या निमित्ताने आज बरेच कार्यक्रम झाले. इव्हेंट झाले.पुढे काय? ओबीसीमध्ये देशात अडीच हजार जाती तर राज्यात ४०० पेक्षा अधिक जाती आहेत. त्यांची लोकसंख्या देशात नी आपल्या राज्यात ५०% च्या वर असताना त्यांचे पोलादी ऐक्य का होत नाही? ह्या सर्व जाती एकत्र का येत नाहीत? हा प्रश्न अनेकजण विचारतात.[ads1]
१) देशात हिंदुत्ववादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, लोकशाही समाजवादी, गांधीवादी सत्तावादी अशा अनेक विचारधारा आहेत. ही स्कुल्स कधीच एकत्र येणार नाहीत. हे सगळेच एकमेकांना पाण्यात पाहतात. ते स्वतः वाढण्यासाठी इतरांना छोटे करण्याचा आटापिटा करतात. ते सगळेच एकमेकांना स्पर्धक मानतात. त्या सर्वात ओबीसी विभागलेले आहेत.
२)ओबीसीतील प्रत्येक जातीच्या संघटना आहेत, नेते आहेत, जातपंचायती आहेत. त्या मजबूत करण्यासाठी ते झटतात. त्यांना आपापली ओळख प्रिय आहे. ती कायम राहावी असेच सर्वांना वाटते. त्यामुळे ओबीसी ऐक्य दिखाऊ असते.
३) सर्वांना मान्य होईल असा नेता, कार्यक्रम, आदर्श, संघटन आजपर्यंत उभे राहिलेले नाही. यातल्या प्रत्येक नेत्यांचा प्रयत्न स्वतः कसे मोठे व्हायचे, या ताकदीचा वापर करून स्वतःची मिळकत नी सत्ता कशी मिळवायची, सत्तेतून पुन्हा मिळकत कशी वाढवायची हाच प्राधान्यक्रम राहिल्याने त्यांच्या वाढीला मर्यादा पडतात.
४) नेते इतरांचे श्रेयही स्वतःच्या नावावर जमा करतात. दुसऱ्यांना क्रेडिट देण्याइतपत मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे नाही.
६) सर्वांना शॉर्टकटने मोठे व्हायचंय. प्रदीर्घ नी कायमस्वरूपी त्याग, बांधणी, दूरदृष्टीचे राजकारण हा आवाकाच नाही.
७) वखवखलेले राजकारणी,आत्ममग्न बुद्धीजीवी, आप्पलपोटा मध्यमवर्ग नी अल्पसंतुष्ट सामान्य माणूस हा तिढा काही सुटत नाही.
७) ओपिनियन मेकर व्हायची कुवत नाही नी आहे त्यांना आपली खुर्ची वरच्या जाती/वर्णात लावायची असल्याने ते आपले नाते ओबीसीशी न सांगता ऊच्चवर्णाची शिपाईगिरी, हुजरेगिरी आनंदाने करतात.[ads1]
मग हा तिढा सुटायचा कसा?ओबीसीचा वापर सगळेच करतात, देशात ओबीसी पर्व सुरू झालेय, पण जोवर एकजूट नाही तोवर प्रस्थापित लोक ओबीसीला अधिकार नी हक्क देणारच नाहीत.
तोंडाने बोलतील पण ती नौटंकी असेल फेकुची, ओबीसीचे भवितव्य नी विकास यासाठी मार्ग कोणता?
[author title="प्रा.हरी नरके" image="http://localhost:10004/wp-content/uploads/2022/06/Hari-narke.jpg"]जेष्ठ ओबीसी विचारवंत, साहित्यिक, महात्मा फुले साहित्याचे लेखक[/author]
Post a Comment