जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

कळंब, जि.धाराशिव - दि. १५ | तालुक्यातील मौजे माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.[ads1]

विविध स्वतंत्र्यवीरांच्या वेषभूशेत गावातून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी मोठ्या उत्साहात व वाजत गाजत काढण्यात आली. मुख्य कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. शालेय परीसर पताका, रांगोळी आणि तिरंगी फुग्यांनी सजविण्यात आला होता. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.विजय व्यंकटराव शिंदे व मुख्याध्यापक श्री संतोष प्रभू भोजने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री विलास मोहिते, उपसरपंच श्री शरद गालट, पोलिस पाटील श्री.विशाल टिंगरे, परमेश्वर लोमटे, सेवानिवृत्त आदर्श प्राथमिक शिक्षक श्री कल्याण लोमटे यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात भाषणे, आणि देशभक्ती पर गीतांमधून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला.[ads3]

शाळेच्या होत असलेल्या प्रगती बद्दल मुख्याध्यापकांनी उपस्थितांना अवगत केले. शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल शिक्षकांचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. शाळेच्या सजावटीसाठी श्रीमती भारती सूर्यवंशी व समीना बागवान यांनी कष्ट घेतले. सहशिक्षक श्री हनुमंत घाडगे यांनी आभारप्रदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post