बुलडाणा- दि. 11| काँग्रेस पक्षाचा ओबिसी संघर्ष मेळावा बुलडाणा येथे संपन्न झाला . कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे होते तर ऊद्घाटक मा ना विजयजी वडेट्टीवार ( मंत्री , बहुजन कल्याण , मदत व पुनर्वसन ) हे होते तर प्रमुख उपस्थिती मा. हर्षवर्धन सपकाळ, कल्याणजी दळे, श्यामबाबु उमाळकर, संजयजी राठोड, सौ स्वातीताई वाकेकर, धनंजय देशमुख, संजय किनगे, भागवत वानेरे, निसार चौधरी, मुख्त्यारसींग राजपुत, समाधान सुपेकर, दिपक देशमाने, ओबिसी जिल्हाध्यक्ष गजानन खरात सर मनोज कायंदे, दत्ताभाऊ काकस, श्लोकानंद डांगेे, शैलेश खेडेकर यांची होती .
विद्यार्थ्यांना निधी उपलब्धकरून द्या- अजय तायडे यांची मागणीनिवडणुकी पर्वी ओबिसी आरक्षण लागु करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच ओबिसी विद्यार्थ्याना UPSC , MPSC सोबतच परदेशात शिक्षणासाठी शासनाकडुन अनुदान देण्यात यावे, महाज्योतीला मोठ्य प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारच्या मागण्या यावेळी अजय तायडे यांनी केल्या .
यावेळी बोलताना विजयजी वडेट्टिवार यांनी ओबिसींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगुन , ओबिसीं करिता सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविनार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व महाज्योतीला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देत UPSC, MPSC NEET मध्ये ओबिसींचा सहभाग वाढविण्यासाठी व ओबिसींच्या सर्वांगीन विकासाकरीता महाविकास आघाडीच्या माध्यमातुन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले आहे. कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणात उपस्थीती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय तायडे, प्रास्ताविक दिपक देशमाने यांनी केले, तर आभार दत्ताभाऊ काकस यांनी मानले .
Post a Comment