जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे गुंज सामाजिक संस्थेकडून शैक्षणिक साहित्य वाटप

कळंब, जि.उस्मानाबाद -  दि.28 | तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री. मधुकररावजी तोडकर व गुंज सामाजिक संस्थेचे श्री अजित कांकरिया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

गुंज सामाजिक संस्था नवी दिल्ली यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वही टिफिन बॉक्स वाटर बॉटल कंपास या शैक्षणिक साहित्याचे वाटप आज करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री विलास मोहिते तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विजय व्यंकटराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. गुंज सामाजिक संस्थेने यापूर्वीही शाळेत श्रमदानाच्या माध्यमातून शालेय परिसराची साफसफाई करून घेतली तसेच शाळेला परसबाग हि तयार करून दिली.

भविष्यामध्ये शाळेला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल त्या गोष्टी पुरवण्यात येतील असे गुंज संस्थेचे श्री अजित कांकरिया यांनी उपस्थितांना सांगितले. सदर कार्यक्रमास संस्थेच्या समन्वयक श्रीमती हबीबा आसाम येथून तर श्रीमती तृप्ती मॅडम या दिल्ली येथून या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित होत्या. विद्यार्थी व शाळेत चालत असलेल्या विविध ॲक्टिविटी पाहून गुण संस्थेने समाधान व्यक्त केले. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री तोडकर साहेब यांनी सांगितले की शाळेचा गेल्या चार वर्षाचा प्रगतीचा आलेख हा वाढत चाललेला आहे. शाळा भौतिक दृष्ट्या सर्व सोयींनी सुसज्ज झाली असून शैक्षणिक गुणवत्ता ही अतिशय चांगल्या प्रकारे वाढली आहे.

याप्रसंगी गावचे उपसरपंच श्री शरद गालट शालेय समितीचे उपाध्यक्ष नर्सिंग गोडसे, सदस्य नाना वटाणे, पांडुरंग मुळे, गटशिक्षण कार्यालयातील साधनव्यक्ती श्री गणेश तपिसे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष भोजने सहशिक्षक श्री हनुमंत घाडगे श्रीमती भारती सूर्यवंशी श्रीमती समीना बागवान यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post