बोरगांव येथे १० उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न 

बोरगांव- दि. २० | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव बुद्रुक यांच्या तर्फे गावातील दहावी उत्तीर्ण (शाळेतली माजी) विद्यार्थ्याचा सत्कार शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री.उकिरडे सर, व गावकरी यांच्या तर्फे करण्यात आला. 1)खांडेकर सुप्रिया संभाजी 91%. 2) कांबळे निशांत संतराम 90% 3) गाडे अतीष कल्याण 89% प्रथम तीन विद्यार्थी यांचा शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पवार सुनीता, रणदिवे साधना, शेळके सायली, भोजने पुनम, एडके रोहन,कोळी अभय याही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किरण मस्के (अध्यक्ष), सुभाष रणदिवे (सरपंच), महादेव थोरात(उपसरपंच), मनोज माळी, शंकर कांबळे, अनुरथ हजारे, नितीन रणदिवे व इतर पालक वर्ग, सर्व शिक्षक जाधव सर, पवार मॅडम, उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाखरे एस व्ही यांनी केले व आभार समुद्रे एस टी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post