आणि ओबीसी चक्क जागा होतोय: प्रा. हरी नरके

इंपिरिकल डेटा व ट्रिपल टेस्ट चा अहवाल तयार करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समर्पित आयोगाने नुकताच पुणे, औरंगाबाद व नाशिक या महसुली विभागाच्या मुख्यालयांचा दौरा केला.

सुमारे एक हजार कार्यकर्ते, नेते, संस्था, संघटना यांनी आयोगाला निवेदने सादर केली. ही जागृती आनंददायक आहे. ओबीसी समाज जागा होतोय ही उमेद वाढवणारी गोष्ट आहे. आयोगाचा अजून कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर या महसूल विभागांचा दौरा बाकी आहे.

गेल्या २५ वर्षात ओबीसी राजकीय आरक्षणाचे सुमारे ३ लाख लाभार्थी असून विद्यमान लाभार्थी ८५ हजार आहेत. त्यातले चक्क १ हजार लोक निवेदने द्यायला आले ही घटना

ऐतिहासिक होय.१४ वर्षांपूर्वी राज्य मागास वर्ग आयोगाकडे अवघे एक निवेदन आले होते. आज निवेदने द्यायला एक हजार पुढे आले ही घटना इतिहासामध्ये नमूद करण्याजोगी आहे. एकाचे जेव्हा एक हजार होतात, तेव्हा ती मोठी गोष्ट असते. ओबीसी सुद्धा जागा होतो तर! वेळ लागतो, पण हत्ती जागा होतो बरं...[author title="प्रा.हरी नरके" image="http://localhost:10004/wp-content/uploads/2021/2022/06/Hari-narke.jpg"]जेष्ठ ओबीसी विचारवंत, साहित्यिक, महात्मा फुले साहित्याचे लेखक[/author]

Post a Comment

Previous Post Next Post