आधी वृक्षारोपण नंतरच शुभमंगल

खामगाव - दि.05 | तालुक्यातील कंझारा येथील पर्यावरणप्रेमी क्रांतिकारी विचारांचे युवा चि. संतोष शेगोकार व वडनेर भोलजी ता.नांदुरा येथील चि.सौ. कां. दिपाली यांचा विवाह नुकताच पार पडला. परंतु लग्न लावण्यापूर्वी वधू वरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतरच लग्न मंडपात जाऊन लग्न लावले. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत क्रांतीसूर्य न्यूज शी बोलताना संतोष शेगोकार म्हणाले की, "आपल्या कुटुंबाबरोबर पर्यावरण संतुलन राखणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. त्यासाठी आपण वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले पाहिजे आणि हाच संकल्प आम्ही नवदाम्पत्यांनी नवीन जीवनाची सुरुवात करताना केला." क्रांतीसूर्य न्यूज कडून या नवविचाराच्या युवा दाम्पत्याला नवीन आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

Previous Post Next Post