नरेंद्र लांजेवार यांच्या जयंतीदिनी सालईबनात रंगणार कविसंमेलन

बुलडाणा : जिल्ह्याच्या शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व पर्यावरण चळवळीमधील कार्यतत्पर व्यक्तिमत्व, मुक्त पत्रकार, उपक्रमशील ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार यांची 11 मे रोजी जयंती आहे. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्व पत्रात व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणे सातपुड्याच्या पायथ्याशी सालईबनात मैत्रीबन या बहुउद्देशीय केंद्राचा शुभारंभ वृक्षपूजनाने होणार आहे.

नरेंद्र लांजेवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमांमध्ये विविध संस्था आणि व्यक्तींनी दिलेल्या योगदानातून सालईबनात वाचन चळवळ व संशोधकांसाठी अभ्यासाचे केंद्र म्हणून मैत्रीबन या पर्यावरण प्रकल्पाची निर्मिती केली जाणार आहे. मैत्रीबनचा कार्यारंभ दिनांक 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या व नरेंद्र लांजेवार यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

यानंतर तरुणाई फाउंडेशनच्या वतीने सालईबनातील शांतीस्थळावर सायंकाळी 7 वाजता नरेंद्र लांजेवार यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रगती वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, लेक माझी अभियान, प्रगतीशील लेखक संघ, साद माणुसकीची सामाजिकता अभियान, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती बुलडाणा, तरुणाई फाउंडेशन खामगाव व नरेंद्र लांजेवार मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post