राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन

नाशिक,दि.६ मे | लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांची कन्या भुवनेश्वरी भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, दत्ता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, छावा संघटनेचे करण गायकर, हर्षल खैरनार, रामेश्वर साबळे, संतोष जगताप, श्रीराम मंडळ, रवी सोनवणे, रघुनाथ आहेर, दीपक गांगुर्डे, सागर मोटकरी, कैलास वाकचौरे, स्वरूपा खेडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post