11 मे हा दिवस महात्मा दिन म्हणून शासनाने सरकारी पातळीवर साजरा करावा - अ भा महात्मा फुले समता परिषद, पैठण ची मागणी

पैठण - दि. 11क्रांतीसुर्य राष्ट्रपिता‌ ‌महात्मा जोतीराव फूले यांना मुंबई येथे ११ मे १८८८ रोजी महात्मा या पदवीने गौरवण्यात आले. जातिनिर्मूलन, स्त्री पुरुष समानता, ज्ञाननिर्मिती, सामाजिक न्याय, आंतरजातीय विवाह आणि धर्मचिकित्सा या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे भारताच्या सामाजिक विकासाच्या क्रांतीच्या पायाभरणीचे काम करणारे जोतीराव फुले यांना ११ मे १८८८ रोजी मुंबईकरांनी महात्मा पदवी बहाल केली.

क्रांतीसुर्य राष्ट्रपिता‌ महात्मा जोतीराव फुले यांच्या वयाच्या ६१ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने "महात्मा" हि उपाधी बहाल करण्यात आली होती. आज या घटनेला १३५ वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे महात्मा दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रतिवर्षी ११ मे हा दिवस महात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असुन, शासकीय पातळीवर देखील साजरा करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे आयोजक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश दिलवाले, ता अध्यक्ष यांनी सांगितले.

देशातील दोनच व्यक्तींना "महात्मा" या पदविने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्याला समाजाचा विकास करण्यासाठी, देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्याकरिता शिव, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. याप्रसंगी श्री उत्तमराव दिलवाले, श्रीधर ऐडके , रामेश्वर बनकर , संजय जाधव, आदिनाथ कोरडे, अभिषेक बनकर, वैभव दिलवाले, श्रीकांत‌ दिलवाले, सूनिता जाधव, वंदना दिलवाले, आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post