आगीच्या विळख्यात सापडलेल्या कुटुंबांना माळी सेवा मंडळाची मदत

खामगाव-दि. 06 | काही दिवसांपूर्वी तालुक्यातील पिंप्री गवळी येथे आग लागली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली आणि काही समजण्याच्या आतच नरेंद्र अल्हाट व परमेश्वर बंड यांचे रहात्या घरांचे प्रचंड नुकसान झाले. आगीमध्ये घरात साठवलेलं अन्नधान्य सहीत सर्व जिवनावश्यक साहीत्य जळुन खाक झाल्यामुळे दोन्ही कुटुंब अडचणीमध्ये आले होते.

हा सर्व प्रकार माळी सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना माहिती होताच अजय तायडे व प्रदिप सातव यांनी या घटनेची माहिती घेतली व माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हादराव बगाडे, परिचय संम्मेलनाचे अध्यक्ष विजय वावगे , कोषाध्यक्ष विनायक जुमळे यांचे सोबत चर्चा करून घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी नरेंद्र रामदास अल्हाट व परमेश्वर काशिराम बंड या दोन्ही कुटुंबांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. परंतु शासनाने या कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचे समजले. त्यामुळे माळी सेवा मंडळाच्या माध्यमातुन दोन्ही कुटुंबाना प्रत्येकी रु ११,००० /_ ( अकरा हजार रुपये) ची मदत देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी प्रल्हादराव बगाडे, अजय तायडे, प्रदिप सातव, विजयराव वावगे, विनायक जुमळे यांचेसह पिंप्री गवळी येथील वासुदेवराव बंड, प्रल्हादराव बुंदे, अरुण बंड, गजानन भोंबळे, श्रिक्रुष्ण इंगळे, रवींद्र गाढे, प्रकाश बोदडे, संतोष इंगळे, पुरुषोत्तम बंड यांचेसह गावकरी उपस्थीत होते .

Post a Comment

Previous Post Next Post