सवित्री ब्रिगेड तर्फे गुरू शिष्याला अभिवादन

नागपूर- दि. 18 | अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड नागपूर तर्फे महात्मा जोतीराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती "जागर करू या मानवतेचा"हा कार्यक्रम आयोजित करून गुरू शिष्याला अभिवादन केले.या कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडच्याअध्यक्षा आणि कार्यक्रमाच्या विशेष अतिथी डॉ. स्मिताताई मेहेत्रे म्हणाल्या, "विविध उपक्रमातून या महामानवांचे विचार घराघरात पोहोचले तर प्रत्येक व्यक्तीचा सुसंस्कृत विकास झाल्याशिवाय राहणार नाही"

नृत्य, नाट्य,गीत, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धेत प्रथम आलेल्या जया बांबोडे यांचा प्रमाणपत्र आणि माहेरची साडी देवून सत्कार करण्यात आला.तर विविध क्षेत्रातील स्वबळावर कार्य करणाऱ्या जयश्री राणेकर यांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.मालती वराडे यांनी रमाई, मीना गायकवाड यांनी जोतीराव फुले यांचे एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला.त्यांचा शाॅल,श्रीफळ, रोपटे, विचार पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

[caption id="attachment_3745" align="aligncenter" width="1600"] आज महात्मा फुले, डॉ आंबेडकर असते तर... प्रबोधनात्मक भाषण करतांना डॉ.स्मिता मेहेत्रे[/caption]

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रगतीताई मानकर, प्रमुख अतिथी, रजनीताई राणेकर,वैदेहीताई भाटे,वसुधाताई येणकर यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी संध्या गुडधे यांनी आपल्या योगनृत्यातून महापुरुषांना मानाचा मुजरा केला.माधूरी पाटील यांनी महात्मा फुलेंचा पोवाडा म्हटला.भीमगीत सरीता देशमुख यांनी सादर केला.संचलन रजनी चव्हाण, प्रास्ताविक प्रणोती कळमकर, तसेच आभार संगीता लंगडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शितल बनसोड, जयश्री मोहतकर, माधुरी देशमुख, डॉ.दिपा हटवार, स्नेहा पेटकर, ज्योती निचळ,ॲड.रोमा मेहेत्रे, वैष्णवी राणेकर,किरण माटे भारत डाखोळे, शेखर देवगडे, सुनंदा जांबूतकर आदींनी परिश्रम घेतले. गुरूकूल काॅलेज, अयोध्यानगर , नागपूर येथे हा शानदार सोहळा बंधू भगिनींच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post