राज्यपालांचा औचित्यभंग आणि थिल्लरपणा: प्रा. हरी नरके

औचित्यभंग आणि थिल्लरपणा: प्रा. हरी नरके राज्यपालांचे सावित्रीबाईन्च्या विवाहाबद्दलचे वक्तव्य औचित्यभन्ग करणारे असून ते थिल्लरपणाचे आहे. विद्यापीठात बोलताना, १७५ वर्षांपूर्वीचा इतिहास सांगताना जे गांभीर्य आणि जबाबदारीचे भान असायला पाहिजे ते कुलपतीमध्ये अजिबात दिसत नाहीये. त्याकाळात भारतभर बालविवाह होत असत. अगदी कोश्यारींच्या आजीआजोबांचा विवाहही असाच असणार. तेव्हा आपण काहीतरी स्टँड अप कॉमेडी करीत नसून काही एक गंभीर भूतकाळ मांडीत आहोत हे भानच त्यांना नाहीये.

अटतिशय सामान्य वकुबाची माणसं उच्च पदावर बसवली की असेच होणार. लागोपाठ ते अशी वक्तव्यं करीत आहेत. जिजाऊमातेचा अपमान, सावित्रीमाईचा अपमान सहन करता कामा नये. कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापिका व विद्यार्थिनींनी आपल्याला लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्यं केल्याबद्दल राज्यपालांच्या निषेध केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post