सावित्रीबाई फुले
3 जानेवारी दिवस सोन्याचा क्रांती ज्योतीच्या ग जन्माचा सातारा जिल्ह्यातील नायगावी क्षण मोठा सुभाग्याचा खंडोजी नेवसे पाटीलांना लाभ झाला कन्या रत्नाचा. नऊ वर्षाचं वय लाभताना विवाह फुले नि सावित्रीचा ज्योतिबाही साथ देती सावित्रीच्या शब्दांना हाके क्रांती केली शिक्षणाची दूर करण्यास अंधेरा. झगडली अन्यायाशी तीच स्त्रीच्या हक्कांसाठी. ज्ञानज्योत ती घेऊन दिले ज्ञान घरोघरी. पेटविली ती मशाल तिने स्त्रीच्या प्रगतीची. केली सहन बोलणी शेण - दगडगोटेही झेलले. जुमानता न कुणाला जातिभेदाचा धोंडा पायदळी तुडवून... क्रांतीची मशाल घेऊन हाती घडविली इथली नारी. ना कधी ही झुकणारी. सावित्री च्या लेकी आम्ही सदैव राहू कृतज्ञ आम्ही. तुम्हीच शिक्षणाच्या आदर्श हाच तुमचा सन्मान. स्त्रियांच्या शिक्षणाची महान नायिका घडविली इथली प्रधानमंत्री, राष्ट्रपती.
कवयित्री : - डॉ. अनिता बेंडाळे. नाशिक
Post a Comment