महात्मा फुले आद्यशिवचरित्रकार - डॉ. स्मिता मेहेत्रे

नागपूर- दि.19 | दैनिक बहुजन सौरभ आयोजित शिवजयंती समारोहात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा यावर व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना शिवरायांची समाधी शोधून जगातील पहिली शिवजयंती साजरी करून, कुळवाडीभूषण पवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजीचा, हा पोवाडा सर्वात प्रथम रचणारे महात्मा जोतीराव फुले हे आद्यशिवचरित्रकार आहेत. असे प्रबोधनकार, सुप्रसिद्ध लेखिका डॉ. स्मिता मेहेत्रे म्हणाल्या.

महात्मा जोतीराव फुलेंमुळे आम्हाला आमचे बहुजन प्रतिपालक महाप्रतापी राजे शिवछत्रपती कळले. म्हणून शिवजयंती साजरी करतांना शिवरायांच्या प्रतिमेजवळ महात्मा फुलेंची प्रतिमा असावी. असेही डॉ. स्मिता मेहेत्रे यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी माधुरी लोखंडे, डॉ.प्रज्ञा बागडे, डॉ.महेंद्र धावडे, प्रा.नरेंद्र शेंडे, संगीता चव्हाण, दैनिक बहुजन सौरभच्या संपादक मंडळातील डाॅ. सिध्दार्थ काबळे, संध्याताई राजूरकर , मिलिंद फुलझेले तसेच फार मोठ्या प्रमाणात साहित्यिक,अभ्यासक, विचारवंत आणि वाचक वर्ग उपस्थित होता. हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन हाॅल, लष्करी बाग नागपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post