प्रा.हरी नरके लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुस्तकाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते पुण्यात प्रकाशन

पुणे १४:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ज्येष्ठ संशोधक प्रा. हरी नरके लिखित "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले" या इंग्रजी पुस्तकाचे आज मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आले.

यावेळीस महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष नामदार छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

विशेष बाब म्हणजे या पुस्तकाचा विद्यापीठ आवारात स्टाँल लावलेला होता. प्रकाशन समारंभात स्टॉलवर वाचकांनी पुस्तक विकत घ्यायला गर्दी केली होती. पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणीमध्ये संपूर्ण आवृत्ती संपली. दुसरी आवृत्तीही आज निम्मी संपली.

Post a Comment

Previous Post Next Post