जि प प्राथमिक शाळा माळकरंजा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

कळंब- दि. 19 | तालुक्यातील मौजे माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य श्री विजय शिंदे यांनी स्थान भूषविले. यावेळी माजी अध्यक्ष श्री. बाळासाहेब रंगनाथ लोमटे तसेच श्री. सुशील माने उपस्थित होते.

यावेळी श्री. हनुमंत घाडगे सहशिक्षक यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. शाळेतील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी पुदंगे, वैष्णवी कवडे, शिवानी मुळे, श्रेया बारबोले, वैष्णवी भोपी, समृद्धी वाघमारे,राजवीर वाघमारे, संस्कार घाडगे,सार्थक कुलकर्णी, श्लोक घाडगे इत्यादी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावरील पोवाडे, कविता व भाषणे सादर केली.

मुख्याध्यापक तथा श्री संतोष भोजने यांनी विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक करून शिवरायांचे एक एक गुण आपण आपल्या जीवनात उतरविले तर नक्कीच शिवजयंती साजरी केल्याचे सार्थक होईल असे उपस्थित विद्यार्थी व पालकांना सांगितले. सदर कार्यक्रमास सहशिक्षिका श्रीमती भारती सूर्यवंशी यांचेसह स्वयंसेविका कुमारी कुलकर्णी, श्रीमती क्षीरसागर व शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post