कालच्या भेटीत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांनी ३ गोष्टी स्पष्ट केल्या. १) पठारे समितीने सादर केलेला अभिजात मराठीचा अहवाल १००% बिनचूक असून तो भाषातज्ज्ञांच्या शिफारशीवरून केंद्र सरकारने स्वीकारला असून त्याला शासकीय मान्यता दिलेली आहे. २) या अहवालावर केंद्र सरकारच्या या विषयाशी संबंधित सर्व खात्यांचे सकारात्मक अहवाल आल्याने हा दर्जा देण्याची सर्व सिद्धता झालेली आहे. ३) ही घोषणा कधी करायची हा निर्णय मोदी सरकारचे कॅबिनेट ठरवील.
कुजबुज गॅंगने असा अपप्रचार चालवला होता की हा अहवाल सदोष असल्याने केंद्र सरकारकडून हा दर्जा द्यायला विलंब होतोय. ज्याअर्थी मोदी सरकार गेली ७ वर्षे हा दर्जा देत नाहीये त्याअर्थी हा अहवाल सरकारने फेटाळलेला आहे..वगैरे, वगैरे..
अशी कुजबुज मोहीम चालवणाऱ्या चिन्मय, तन्मय, विनय अशा अर्धी चड्डी, अर्धा मेंदू आणि रेशीमकिड्यांचे कवच असणारांचे थोबाड केंद्रीय मंत्री किसन रेड्डी यांच्या या स्पष्टीकरणामुळे एकदाचे फुटले हे एकंदरीत छानच झाले![author title="प्रा.हरी नरके" image="http://localhost:10004/wp-content/uploads/2021/08/PicsArt_08-10-12.12.31-e1628583574837.png"]जेष्ठ विचारवंत, साहित्यिक, महात्मा फुले साहित्याचे लेखक, समन्वयक अभिजात मराठी भाषा समिती[author]
Post a Comment