चारठाणा सह विविध ठिकाणी सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

चारठाणा/जिंतूर- दि.15 | तालुक्यातील चारठाणा सह विविध ठिकाणी आणी परिसरात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी बंजारा समाजाची पारंपारिक वेषभूषे सह पारंपारिक भजनही विशेष आकर्षण ठरले.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील चारठाणा सह परिसरात ठिक ठिकाणी संत श्री. सेवालाल महाराज जयंती दि. १५ फेब्रुवारी रोज मंगळवार रोजी चारठाणा येथे ठिक ठिकाणांसह परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी बंजारा समाजाची पारंपारिक वेशभूषा परिधान करुन पारंपारिक गिते सादर करीत नृत्य करण्यात आले होते.

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त सेवालाल नगर चारठाणा, पत्रकार भवन चारठाणा, सोनापुर तांडा, ब्राम्हणगाव, सावरगाव येथे सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले तर अनेक ठिकाणी कोरोणाचे नियम पाळत मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी सेवालाल नगर चारठाणा येथील बंजारा समाजातील महिलांनी विविध प्रकार पारंपारिक वेशभूषा परिधान करून नृत्यासह पारंपारिक गाने, भजन सादर करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सौ.मीनाताई राऊत, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, मा.उपसरपंच बि.जी.चव्हाण, उपसरपंच वाजेद कुरेशी, ईंद्रजित घाटुळ, मा. उपसरपंच तहेसिन देशमुख, गणेश राऊत, ग्रा.प.सदस्य दौलत देशमुख, नानासाहेब निकाळजे, बाबासाहेब भवाळे, सौ.वंदना तमशेटे, पत्रकार संघाचे प्रभाकर कुर्हे यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास जाधव, गोविंद जाधव, परसराम चव्हाण, गोपीचंद राठोड, तुकाराम राठोड , किसन राठोड, अंबादास राठोड, शंकर राठोड , गणपत राठोड यांच्या सह बंजारा समाजातील पुरूष महिला वर्गाने परिक्ष्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post