माळकरंजा जि.प.शाळेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

कळंब -दि- 6 | तालुक्यातील जिल्हा परीषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे युनोस्को क्लब ऑफ इंडिया अंतर्गत भारतरत्हा6मानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.शाळेतील ग्रंथालय अद्यावत करण्यात आले.ग्रंथालयातील विविध पुस्तके विद्यार्थ्यांना वाचावयास दिली. अभिवादनपर कार्यक्रमात चि.संस्कार घाडगे, ओंकार जाधव, दत्ता जाधव, सार्थक कुलकर्णी, अभय क्षिरसागर, गणेश माळी, स्वप्निल कापरे,आदित्य क्षिरसागर, कु.शिवानी मुळे,  वैष्णवी पुदंगे, वैष्णवी भोपी या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री.संतोष भोजने, सहशिक्षक श्री.हनुमंत घाडगे, श्रीमती भारती सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post